सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे आरोग्यासाठी का योग्य नाही? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण सकाळची पहिली आहाराची निवड आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बर्याच जणांना वाटते की दिवसाची सुरूवात फळांनी करणे हा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे. पण तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी फळे खाण्याचे काही दुष्परिणामही असू शकतात. मुंबईतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील क्लिनिकल डाएटिशियन फियोना संपत यांनी सांगितले की, फळांचे अनेक पौष्टिक फायदे असले तरी त्यांना सकाळी उपाशी पोटी खाणे योग्य नसते. रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने काय होते? फळांमध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) जास्त प्रमाणात असते. फियोना यांच्या मते, उपाशी पोटी फळे खाल्ल्यावर रक्तातील साखर अचानक वाढते थोड्याच वेळात पुन्हा साखर वेगाने खाली येते (crash) त्यामुळे थकवा , घबराट , आणि लवकर भूक लागणे या समस्या निर्माण होतात मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखर अस्थिर असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी संत्री, स्वीट लाइम सारखी सिट्रस फळे रिकाम्या पोटी घेतल्यास अॅसिडिटी व पोटदुखी होऊ शकते. सकाळी फळे योग्य पद्धतीने कशी खाव...