राज्यातील लाखो महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत आनंदाची बातमी समोर येत आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता – 3000 रुपये जमा होण्याची चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे
सध्या सोशल मीडियावर काही पोस्टर्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टर्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की, १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. या दाव्यांमुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली चर्चा
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेच्या काळात निधी वाटप होणार का, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
जर मकरसंक्रांतीच्या दिवशीच रक्कम वितरित करण्यात आली, तर ती आचारसंहितेचा भंग ठरेल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजप उमेदवाराचा दावा काय?
मुंबईतील वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दावा केला आहे की,
“मकरसंक्रांतीचा सण अधिक गोड करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाणार असून, डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3000 रुपये 14 जानेवारीपूर्वी खात्यात जमा होतील.”
या विधानानंतर लाभार्थी महिलांमध्ये आशा वाढली असली, तरी अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
आतापर्यंत किती हप्ता मिळाला?
या योजनेअंतर्गत:
लाभार्थींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच मिळालेला आहे
मात्र डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यांची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे
मकरसंक्रांतीनंतर लगेचच मतदान होणार असल्यामुळे या कालावधीत निधी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष
सध्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि राजकीय दाव्यांवर आधारित चर्चा सुरू असली, तरी राज्य सरकारकडून अधिकृत माहिती येणे महत्त्वाचे आहे. लाभार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त सरकारी घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment