न्यू यॉर्क/वॉशिंग्टन: आपल्या सौरमालेबाहेरील एका दूरच्या ग्रहावर जीवसृष्टी (alien) असण्याची सर्वात ठोस चिन्हं शास्त्रज्ञांना सापडली आहेत. जेम्स वेब अवकाश दुर्बिणीच्या (James Webb Space Telescope) साहाय्याने केलेल्या निरीक्षणातून K2-18 b या परग्रहाच्या वातावरणात असे वायू आढळले, जे पृथ्वीवर केवळ सजीवांद्वारेच निर्माण होतात. 🌍 कोण आहे हा ग्रह K2-18 b? पृथ्वीपेक्षा 8.6 पट जड 124 प्रकाशवर्षे दूर , सिंह राशीत असलेल्या एका "रेड ड्वार्फ" ताऱ्याभोवती परिभ्रमण 2.6 पट मोठा व्यास "हायसिअन वर्ल्ड" प्रकारातील ग्रह – पाण्याने भरलेला महासागर आणि हायड्रोजनयुक्त वातावरण 🔬 कोणते वायू आढळले? डायमेथाइल सल्फाइड (DMS) आणि डायमेथाइल डीसल्फाइड (DMDS) हे दोन्ही वायू पृथ्वीवर समुद्रातील सूक्ष्म सजीव (फायटोप्लँक्टन) तयार करतात. शास्त्रज्ञांनी याचे प्रमाण १० भाग प्रति दशलक्षहून अधिक असल्याचे सांगितले — पृथ्वीच्या तुलनेत हजारो पट जास्त! 🧪 याचा अर्थ काय? शोधाचा अर्थ असा आहे की K2-18 b या ग्रहावर सूक्ष्म जीवसृष्टी असू शकते . पण लक्षात ठेवा, हे थेट जीवन सापडल्याचे जाहीर न करता ...