पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानातील १५ जणांचा मृत्यू 24 डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यांमुळे महिलांसह अनेक निष्पाप नागरिक ठार अफगाणिस्तानमधील खामा प्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यावर हवाई हल्ले केले असून, त्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलां व मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्यांमुळे सात गावांची पडझड हा हल्ला २४ डिसेंबरच्या रात्री करण्यात आला, ज्यामध्ये बर्मल जिल्ह्यातील सात गावांना लक्ष्य करण्यात आले. यात लमन नावाच्या गावामध्ये एका कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, मर्ग बाजार नावाच्या गावाचे संपूर्णपणे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले असून, मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. त्यामुळे या परिसरातील मानवतावादी संकट अधिकच गंभीर झाले आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, या हल्ल्याबाबत अधिक तपशील मिळवण्यासाठी चौकशी केली जात आहे. तालिबानचा तीव्र निषेध या हल्ल्यानंतर अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने ...