Skip to main content

Posts

Showing posts from November, 2024

६० वर्षांनंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार, जाणून घ्या का

  ६० वर्षांनंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार, जाणून घ्या का पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता पदावर कोणीही विराजमान होणार नाही, कारण कोणताही विरोधी पक्ष या पदासाठी पात्र नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी नियम काय सांगतात? नियमांनुसार, विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी संबंधित पक्षाकडे विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के जागा असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत, त्यामुळे २८-२९ जागा असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करता येतो. मात्र, महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे आवश्यक जागा नाहीत. महाराष्ट्र निवडणुकीतील निकाल आणि सध्याची स्थिती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. भाजप: १३२ जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना: ५७ जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी): ४१ जागा महाविकास आघाडीतील पक्षांना मात्र मोठ्य...